बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींंमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत आहे – राज ठाकरे

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी यावेळी देशातील निवडणूका आणि नागरिकांंच्या मानसिकतेवर देखील भाष्य केलं आहे.

या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मनसे पक्ष आहे म्हणून राज ठाकरे आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एका राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. माझं तोंड आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. तसेच आपल्या देशात निवडणूका प्रतिकांवर होत असतात. भारतातील लोकांनी मोदींना पाहून मतदान केलं आहे. तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली आहे.

देशात जो लाट निर्माण करतो तोच जिंकतो. सध्या तसंच झालं आहे. देशात कोरोनाची लाट आली आहे आणि या लाटेवर सगळे लोक स्वार झाले आहेत, असा नकळत चिमटा देखील राज ठाकरे यांनी यावेळी काढला आहे.

कोरोना हा एक आजार आहे पण तो मानसिक आजार देखील आहे. सध्या लोकांची मानसिकता निवडणुका घेण्याची नाही.  समाज राहिला तर निवडणुका घेण्यात अर्थ आहे. समाजाचं मन स्थिरस्थावर करण्याचे प्रयत्न करायला हवेत.  कोरोनाच्या या परिस्थितीत निवडणुकांचा विचार नको, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनानं पतीचं निधन; आर्थिक संकटात असणाऱ्या तरुणीला मित्र-मैत्रिणींनी केली मोलाची मदत

नागपूरात आज आढळले फक्त 203 नवे रूग्ण; कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

‘ही’ एक गोष्ट कोरोना संक्रमणामध्ये मृत्यूचा धोका कमी करते, NIMSचा मोठा दावा

बाप की हैवान? पत्नीने जेवण न वाढल्याच्या रागात 9 महिन्याच्या चिमुकलीची हत्या

लग्नात स्टेजवर जाण्याआधीच नवरीनं केला हवेत गोळीबार, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More