बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वपक्षातील खासदारामुळे भाजप अडचणीत, ‘या’ एका मागणीनं विरोधक आक्रमक

नवी दिल्ली | सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी पक्षामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीचे दिवस हे पेगॅसस आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून वायाला गेले. यानंंतर मंगळवारपासून विरोधकांनी संसदेत जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. विरोधकांसह भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी देखील अधिवेशनात हाच मुद्दा उपस्थित केला.

संसदेत ओबीसी आरक्षणावर चर्चा सुरु असताना संघमित्रा मौर्य म्हणाल्या की, मागील सरकारांनी जातीनिहाय जनगणनेला विरोध केला होता. मात्र, मोदी सरकारने आता राज्यांना याचा अधिकार दिला आहे. संघमित्रा यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे सर्व खासदार चकीत झाले.

पुढे बोलताना संघमित्रा मौर्य म्हणाल्या की, 1931 सालापासून देशात जातीनिहाय जनगणना झाली नाही. त्यावेळी देशातील ओबीसींचं प्रमाण 52 टक्के होतं. मात्र, अलिकडच्या काळातील ही आकडेवारी उपलब्ध नाही. यामुळे ही जनगणना झाल्यास ओबीसींना सरकारी योजनांचा लाभ मिळेल.

दरम्यान, ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मुद्यावर बोलणाऱ्या त्या पहिल्या भाजप खासदार आहेत. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या संघमित्रा मौर्य या कन्या आहेत. लोकसभेत त्या बदायू मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

दीर्घकाळासाठी मुलांच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव राहणार – WHO

आता ‘या’ दिवशी साजरा होणार ‘राष्ट्रीय भालाफेक दिन’

“…तोपर्यंत RSSचा आरक्षणाला भक्कम पाठिंबा”

भारतातील ‘ही’ चार मोठी शहरं पाण्याखाली जाणार; IPCC चा धक्कादायक रिपोर्ट

कुस्तीपटू विनेश फोगट निलंबित! ऑलिम्पिकमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानं WFI ची धडक कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More