‘भाजप फ्लॉवर नाही तर फायर आहे’; पुष्पाचा डायलॉग ट्विट करत चित्रा वाघ यांची फटकेबाजी
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाकडून 12 आमदारांचा निलंबन रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग ट्विट केला आहे. ‘महाबिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलं आहे. कायदा आणि नियम पायदळी तुडवून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले. परंतू, सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
‘महाबिघाडी सरकार किती खुनशी आणि किती असंवैधानिक वागतयं हे स्पष्ट होत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान भाजपच्या 12 आमदारांच निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, सहामहिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी निलंबन हे घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यसरकार जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. माझं स्पष्ट मतं आहे की, अशा प्रकारचं निलंबन हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहमती शिवाय होऊ शकत नाही. सगळ्यांनी मिळून हे षडयंत्र रचलं होतं, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला बरखास्त करा”
Omicron विषाणू कितीकाळ जीवंत राहू शकतो?, अभ्यासातून महत्त्वाची माहिती आली समोर
“‘मद्य’राष्ट्र बनविण्यसाठी नेमकी कोणाशी डील झाली?”; फडणवीसांचा सरकारवर घणाघात
नवजोत सिंह सिंद्धूच्या अडचणी वाढल्या, बहिणीनेच केले ‘हे’ गंभीर आरोप
लसीकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती; आता नाकावाटेही घेता येणार कोरोना लस
Comments are closed.