बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्याला भाजप जबाबदार”

मुंबई | कोरोनानं (Corona) जगभराचं टेन्शन वाढवलं आहे. यातच आता ओमिक्राॅननंही (Omicron) डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण झालं आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता सरकारनं काही कडक निर्बंध घातले आहेत. अशातच आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी कोरोनाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. तर दुसरीकडे राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार रंगात आला आहे. यावरुनच आता नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पंतप्रधान लोकांना नियमांचे पालन करायला सांगत आहेत. मात्र तरीही तरीही भाजपचे लोक त्यांचं ऐकत नाही.

पुढे मलिक म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये गृहमंत्री, योगी हजारोंच्या संख्येनं लोक जमवतायत. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपच्या लोकांचा हात राहील हे स्पष्ट आहे.

दरम्यान, ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता देशात तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाविद्यालये बंद करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती, म्हणाले…

ओमिक्रॉननंतर आता ‘या’ नवीन विषाणूची दहशत, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

‘ही लक्षणं दिसली तरी…’; केंद्राच्या राज्यांना सूचना

“त्याच्या छाताडावर उभं राहून…”, मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More