बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केवळ भाजप असा पक्ष आहे जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो”

नवी दिल्ली | केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केल नसून तो सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे, अशा शब्दात तिखट शब्दात भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचाराला वेग आला असून भाजपचे अनेक नेते आता आसाममध्ये जाऊ लागले आहेत. आसाम विधानसभा निवडणूकीत भाजपकडून उमेदवारी दिलेल्या रमानी तंती यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी स्मृति इराणी बोलत होत्या.

काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर भाजपलाच  मत द्या, असं आवाहन स्मृती इराणी यांनी सभेला संबोधित करताना केलं आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अनेक योजना तयार केल्या आहेत, ज्याचा जनेतेला पुर्ण लाभ घेता येणार असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाशी युती करण्यापासून पक्षाला थांबवलं होतं. मात्र त्या ज्येष्ठ नेत्याचं निधन झाल्यावर लगेचच काँग्रेसने अजमल यांच्या पक्षाशी युती केल्याचा आरोपही इराणी यांनी आपल्या भाषणात केला आहे.

थोडक्यात बातम्या-  

फक्त भाजप सत्तेत येऊ नये त्यासाठी कोणासोबतही युती करण्याची तयारी- इम्तियाज जलील

‘या’ घोडचुकीने पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं झालं निलंबन

राज्य सरकार भ्रष्टाचाराचा आरसा बनला आहे- विखे पाटील

गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या धनश्रीची मृत्यूशी झुंज, अनेकांनी केलं मदतीचं आवाहन!

‘या’ शहराने केला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्टर प्लॅन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More