देश

भाजप हीच खरी तुकडे तुकडे गँग- सुखबीर सिंग बादल

चंदीगड | शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजप देशातील खरी तुकडे-तुकडे गँग आहे, असं सुखबीर सिंग बादल यांनी म्हटलं आहे.

देशप्रेमी पंजाबला भाजप जातीय आगीत ढकलत आहे, असा शब्दात सुखबीर सिंग बादल यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

भाजपने राष्ट्रीय एकताचे तुकडे केले आहेत, निर्लज्जपणे मुस्लिमांविरूद्ध हिंदूंना भडकावलं आहे. आता ते आपल्या शीख बांधवांच्या विरोधात असं करत आहेत, असं सुखबीर सिंग बादल म्हणाले.

त्यांची आमच्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याची हिम्मत कशी झाली? शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याचा हक्क भाजपाला किंवा इतर कोणाला कुणी दिला? शेतक्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले आहे आणि आपण त्यांना देशद्रोही म्हणत आहात? जे त्यांना देशद्रोही म्हणत आहेत, ते स्वत: गद्दार आहेत, असं सुखबीर सिंग बादल म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

70 वर्षीय शेतकऱ्याचा सिंघू सीमेवर आंदोलनादरम्यान मृत्यू!

“देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा”

नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत- अजित पवार

प्रतिक्षा संपली! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठी मुहूर्त सापडला

“रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या