बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप काँग्रेसचं नाव पुसायला निघाल्यामुळेच राज्यपालसुद्धा पंडित नेहरुंबद्दल काहीही बरळतात”

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये सतत कोणत्या न कोणत्या मुद्यावरून खटके उडताना दिसत आहेत. राज्य सरकार मधील अनेक मंत्री राज्यपालांच्या कारभारावरुन त्यांच्यावर टीका करत असतात. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांववर निशाणा साधला आहे.

भाजप देशाच्या इतिहासातून काँग्रेसचं नाव पुसायला निघाला आहे. यामुळेच तर राज्यपाल पदावरील व्यक्तीसुद्धा पंडित नेहरू यांच्याबाबत काहीही बरळत असतात. या सगळ्याला उत्तर देणं आता गरजेचं बनलं आहे, असं पटोले यांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच नव्या पीढीला काँग्रेस आणि स्वतंत्र्य यांचा संबंध समजून देण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे एक निमित्त आहे. नव्या पीढीलाही या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कोण घरात होते व कोण बाहेर, हे समजेल. आपापल्या मतदार संघातील लोकांना या मोहिमेची माहिती द्या आणि स्वत: त्यात सहभागी व्हा, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.

दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांनी मागील आठवड्यामध्ये नेहरूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरु यांना शांतीदूत बनावं असं वाटत असल्यामुळेच देश कमकुवत झाला, असं राज्यपालांनी म्हटलं होतं. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

थोडक्यात बातम्या –

‘पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी होणार की नाही?’; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा हा निर्णय

काँग्रेसला नवीन रणनीतीकार भेटला? सोनिया गांधी लवकरच निर्णय घेणार!

‘नवाब मलिकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी ‘तो’ ठराव रद्द करावा’; भाजप नेत्याचं मलिकांना आव्हान

“राज्यपालांचे वर्तन दुर्दैवी, ते भाजप नेता म्हणून आरएसएससाठी काम करत आहेत”

संसदेत पेगॅसस प्रकरणावरून गदारोळ, राज्यसभेच्या अध्यक्षांनी TMCच्या खासदारांना केलं निलंबित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More