Top News महाराष्ट्र सांगली

‘पडळकराचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती’; जयंत पाटलांचा पडळकरांना टोला

photo credit- Facebook/ gopicghand padalkar and jayant patil

सांगली | जेजुरीत अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणावरुन पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती.गोपीचंद पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालं आहे, भाजप किती अस्वस्थ झालेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पडळकरांची वक्तव्य, अशा शब्दात जयंत पाटलांनी पडळकरांचा समाचार घेतला आहे. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, त्यांना किती फस्ट्रेशन आलं आहे हे यातून स्पष्ट होत असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पडळकराचं बोलणं हे सुसंस्कृत राजकारणाला शोभत नाही. ते नेहमीच बेताल वक्तव्य करत असतात. पडळकराचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती. तसंच एन-केन मार्गाने प्रयत्न सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे, अशा शब्दात पाटलांनी पडळकरांवर टीका केली आहे.

दरम्यान, अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे हात लागता कामा नये, असं म्हणत पडळकरांनी पवारांवर टीका केली होती.

थोडक्यात बातम्या-

‘अशा’ लोकांवर जबरदस्त दंड ठोठवायला हवा- मकरंद अनासपुरे

पूजा चव्हाण प्रकरणावर अनिल देशमुखांनी सोडलं मौन, म्हणाले…

व्हाॅट्स अॅप आणि फेसबुकला सुप्रिम कोर्टाचा धक्का

…नाहीतर शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

21 वर्षीय दिशाला का केली अटक?; नेमके काय आहे टूलकिट प्रकरण?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या