बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप सत्ता गेल्यानं विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत- मनीषा कायंदे

मुंबई | भांडूप येथे एका मॉल मध्ये जिथे आता कोव्हिड सेंटर उभारलं होतं तिकडे एक दुर्दैवी प्रकार घडला आणि त्या ठिकाणी आग लागली. अनेक लोक मृत्युमुखी पडली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिकडे पाहणी करायला गेले. त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील गेले. परंतु तिकडे जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करणे. आगीची पाहणी करणे किंवा त्याची चौकशीची मागणी करणं हे आम्ही समजू शकतो. परंतु तिकडे जाऊन देखील महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेले राजकीय विषय हे देखील ते बोलायचे विसरले नाहीत, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे.

महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता गेल्यामुळे इतकी विचलित झाले आहेत की मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला देखील ते विसरत नाहीत. आता महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी खरा चेहरा ओळखलेला आहे. सिताराम कुंटे यांच्या सारखे एक मराठी आयएएस अधिकारी यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. अशा अधिकाऱ्यांवर देखील ते आता अविश्वास दाखवत आहेत आणि त्यांची बदनामी करत आहेत हे अतिशय घृणास्पद आहे, असंही मनीषा कायंदे यावळी म्हणाल्या.

गृह विभागाचा अहवाल जो एक प्रसिद्ध झाला त्याबद्दल तपास निश्चितच होईल. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याबद्दल सविस्तर बाजू मांडली आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी जो कबुलीजबाब दिलेला आहे तो देखील सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोण राजकारण करत आहे आणि कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना बळी पाडले जात आहे. त्यांना हाताशी धरुन राजकारण केले जात आहे, असं मनीषा कायंदेंनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, मनसुख हिरेन याच्या तोंडामध्ये जे रुमाल कोंबले होते ते आता गायब झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे. हा तपास ‘एटीएस’ करत होती आणि आता तपास ‘एनआयए’कडे सोपवला आहे. त्यामुळे सत्य लवकरच बाहेर यावं असं आम्हाला देखील वाटतं, असं देखील मनीषा कायंदे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या –

10वी आणि 12 वीच्या परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील- नितीन गडकरी

ऐकावे ते नवलच! ना भारतात, ना परदेशात, बापाने केली बाळासाठी चक्क चंद्रावर जमिनीची खरेदी

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ‘इतके’ वर्ष लागणार- बिल गेट्स

ड्रीम्स मॉलमधील कोविड सेंटरच्या आगीला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More