Top News आरोग्य कोरोना मुंबई राजकारण

भाजपच्या किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण

मुंबई | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. शिवाय राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक नेतेमंडळींनाही कोरोनाने गाठलंय. यामध्ये आता भाजप नेते किरीट सोमय्या यांना करोनाची लागण झाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासोबत त्यांच्या पत्नीनाही कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सोमय्या त्यांच्या ट्विटमध्ये लिहीतात, “मी आणि माझी पत्नी प्रा. डॉ मेधा सोमय्या कोरोना बाधित झालो असून रूग्णालयात उपचार सुरू झाले आहेत.

राज्यावर कोरोनाचं संकट कोसळल्यावर सोमय्या यांनी अनेक भागांत जाऊन प्रत्यक्ष मदत केली होती. तर, वेळोवेळी राज्यातील करोना स्थितीवरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

दरम्यान राज्यात आज ६७११ रुग्ण बरे झाले असून एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ कोरोना बाधित रुग्ण बरे झालेत. सातत्याने बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ९,१८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ७३५ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आज ६७११ रूग्ण बरे होऊन घरी, तर राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर- राजेश टोपे

आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत, पंतप्रधान मोदींची ग्वाही

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन ‘या’ तारखेला शिथिल होणार, पालकमंत्री अमित देशमुख यांची घोषणा

माझ्यासाठी दुसरा कुठला जाॅब असेल तर बघा; का म्हणत आहे अमिताभ बच्चन असं?

…मग नका जाऊ स्टार किड्सचे चित्रपट पहायला, करिना कपूर खानचं धक्कादायक वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या