मुंबई | बिहारमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखलीये. तर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान निवडणूकीत शिवसेनेला 22 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाल्याचं समोर आलंय. या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलंय. “बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिट गुल. १ टक्का मतं देखील नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?”, असा सवालही सोमय्या यांनी केलाय.
बिहारमध्ये शिवसेनेला मिळालेल्या मतांवरून भाजपा नेते निलेश राणे यांनीही टीका केली होती. “वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन” असं राणे म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
बिहारच्या विजयी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ नेत्याला दिला मोठा इशारा
‘हा’ नेता बनणार बिहारचा मुख्यमंत्री?; नरेंद्र मोदींच्या भाषणात स्पष्ट संकेत
…तेव्हा आम्ही राज्यात पर्यायी सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
“फायद्यासाठी बिहारमध्ये दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव होता”
अर्णब गोस्वामींना मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर