बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान मोदींच्या विरोधात आघाडी सरकारमधील तीनही पक्ष बदनामीचा कट रचतायेत”

मुंबई | महाराष्ट्र बंदवरून भाजपच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिका केली होती. त्यानंतर आता भाजपच्या काही केंद्रीय नेत्याच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली होती. यावेळी भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी “महाविकास आघाडीच्या दुष्कृत्याचा, कारभाराचा, भ्रष्टाचाराचा एक पेपर काढून आम्ही लवकरच जनतेसमोर मांडणार आहोत”, असा इशारा त्यांनी दिला आहे.

याशिवाय ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात बदनामीचा कट सरकारमधील तीनही पक्ष रचत आहेत. ते आम्ही लवकरच उघडकीस आणू. महाविकास आघाडी आपल्या खोट्या कल्पनांवर विजयाची गुढी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. तो सफल होणार नाही. महाराष्ट्रातली जनता त्याला थारा देऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला जी मदत आवश्यक आहे. ती मदत हे सरकार करू शकत नाही. म्हणून आम्ही जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषादेखील ठरवली आहे.” असं शेलार म्हणाले आहेत.

भाजपच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. ज्यामध्ये भाजपचे काही केंद्रीय नेते उपस्थित होते. ही बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेेते प्रविण दरेकर, केंद्रीय प्रभारी सी.टी.रवी, गिरीश महाजन, संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे सदस्य उपस्थित होते.

यावेळी भाजपकडून एका कुटूंबाला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना शेलार यांनी ‘चोर मचाये शोर’ असा प्रतिहल्ला केला आहे. त्याचबरोबर “आमच्या संपर्कात काही लोक, परिवार स्थानिक नेतृत्व आहेत. मात्र त्याविषयी आत्ताच बोलता येणार नाही. याशिवाय आमच्याकडे येत्या निवडणुकांचा आराखडा तयार असून येणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला ताकदीच्या जोरावर अधिक यश मिळेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

 

थोडक्यात बातम्या-

…म्हणून देशात जाणवतोय कोळशाचा तुटवडा, केंद्रानं दिलं उत्तर

‘हे कृत्य राक्षसी’; पुण्यातील घटनेवर अजित पवार संतापले

पुण्यातील ‘त्या’ क्रुर घटनेवरून चित्रा वाघांना संताप अनावर, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, वडेट्टीवार ‘या’ कारणामुळे नाराज

“दसऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरूवात; आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More