बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांविरोधात देवेंद्र फडणवीस आक्रमक, क्लीन चिटला केला विरोध

नागपूर | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना एसीबीने क्लीनचिट दिल्यानंतर आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एसीबीने कोर्टात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अजित पवार यांच्यासोबत 80 तासांचे सरकार स्थापन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सिंचन घोटाळ्यात मंत्र्यांकडून सर्व जबाबदारी काढून अधिकाऱ्यांवर घोटाळ्याची जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न होत आहे.

2018 चा निर्णय खोडून काढणारा एकही पुरावा आज सादर करण्यात आला नाही. त्यामुळे कोर्टही हे प्रतिज्ञापत्रक स्वीकारणार नाही. आम्ही काही प्रमाणात सभागृहातही हा मुद्दा उचलणार आहोत,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एसीबीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोणत्याही प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये अजित पवार यांचा संबंध असल्याचे दिसत नसल्याचं एसीबीने आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More