बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणंच बाकी ठेवलंय”

पुणे | पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक गणेशोत्सवासाठी पुण्यात येत असतात. आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात गणपती बाप्पाचं विसर्जन गणेशभक्त करत आहेत. पुण्यातील मानाचा चौथा गणपती असणाऱ्या तुळशीबाग गणपतीचं ढोल-ताशा वादन सुरू असताना पोलिसांनी त्यांच्याजवळील वादन साहित्य काढून घेतलं, या घटनेवरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे. पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक थांबवून ढोल-ताशे जप्त केलं आहेत. त्यामुळे खंडणी सरकाच्या या दडपशाहीचा हिशोब चूकता केल्याशिवाय जनता राहणार नाही, असं म्हणत भातखळकरांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

आज सकाळी 11 वाजता कसबा गणपतीसह मानाच्या इतर चारही गणपतीचं विसर्जन केलं जाणार होतं. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल- ताशे वाजवले जात असताना पोलीस त्या ठिकाणी पोहचले आणि मिरवणूकीचं साहित्य जप्त केलं. त्यानंतर त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, मंडळाचे खजिनदार नितीन पंडीत यांनी सांगितलं की, पोलिसांनी आमच्यावर कारवाई केली नसून फक्त समज दिला आहे. त्यानंतर तुळशीबाग मंडळाची मिरवणूक शांततेत पार पाडली आणि गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.

थोडक्यात बातम्या- 

…अन् एका क्षणात जमीनदोस्त झाली 3 मजली इमारत, पाहा व्हिडीओ

देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

निष्काळजीपणा जीवावर बेतला, कोरोना टेस्ट करताना किट घशात अडकल्याने महिलेचा मृत्यू

पतीसोबत बहिणीचं अफेअर असल्याचं कळताच पत्नीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘बहुमत चाचणीला तयार राहा’; अमरिंदर सिंग यांचा थेट हायकमांडला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More