पराभव पत्करावा लागला तर आयुष्यभर मिश्यांशिवाय फिरेन; भाजप उमेदवाराचा पण

रायपूर | भाजपच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला तर आयुष्यभर मिश्यांशिवाय फिरेन, असा अजब पण छत्तीसगडमधील भाजप नेत्यानं केला आहे. डॉ. श्रवण श्रीवानी असं या नेत्याचं नाव असून ते राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. 

रायगड जिल्ह्यातील खरसिया मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काँग्रेसनं इथं युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पटेल यांना मैदानात उतरवलं आहे, तर भाजपने जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिलेल्या ओ. पी. चौधरींना तिकीट दिलं आहे. 

भाजपचे चौधरी विजयी होतील, असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते श्रवण श्रीवानी यांना आहे. त्यामुळे त्यांनी मिशा काढण्याचा पण केला आहे. 

याआधीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने हा मतदारसंघ लिलया जिंकला होता. आता भाजपने हा मतदारसंघ जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी उद्धव ठाकरे आता पंढरपूर दौऱ्यावर!  

-सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं- नरेंद्र मोदी

-आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर

-कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद