भाजप नेत्याच्या घरात अश्लील पार्टी, 33 जणांना अटक

वाराणसी | भाजप नेत्याच्या घरात अश्लील पार्टीचं आयोजन केल्याचं समोर आल्यानं वाराणसीत एकच खळबळ उडालीय. पोलिसांनी 25 तरुणांसह 8 तरुणींना ताब्यात घेतलंय. 

दुर्गाकुंड परिसरात अश्लील पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्यांना धक्कादायक दृश्य पहायला मिळाली. अर्धनग्न अवस्थेत तरुण तरुणी डान्स करत होते. 

ही रेव्ह पार्टी असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. ज्या इमारतीत ही पार्टी सुरु होती ती भाजप नेत्याची असल्याची माहिती आहे. त्याने ती बँक्वेटवाल्याला भाड्याने दिली होती. पोलीस दोघांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं कळतंय.