बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झालेत”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | सुमारे सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सरकार ठोस भूमिका घेत नाही. आमच्या मागण्या मान्य कराव्यात हे म्हणणं घेवून संप करणाऱ्यांचा संप आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यानं मुंबई पोलिसांना अडचणीत टाकलं आहे. अशातच भाजप नेते अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झाले आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य बोंडेंनी केलं आहे.

आता शरद पवारांनीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करावी, असंही बोंडे म्हणाले आहेत. फ्रान्सच्या राजाला भर चौकात जनतेनं फाशी दिली होती त्याचीच पुनरावृत्ती राज्यात होत आहे. शरद पवारांनी जाहीर केलं पाहीजे राज्यात माझीच सुरक्षा नाही तर जनतेचं काय?, असं वक्तव्य बोंडेंनी केलं आहे.

दरम्यान, एसटी कामगारांच्या अचानकपणे हल्ला करण्यानं राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी पवारांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवारांनी 120 एसटी कर्मचाऱ्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं”

“नरेंद्र मोदींनी ‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘गुजरात फाईल्स’ची प्रसिद्धी करावी”

ST कर्मचाऱ्यांचा पवार कुटुंबीयांना घेराव; सुप्रिया सुळेंची आंदोलकांना हात जोडून विनंती, म्हणाल्या…

ईडीच्या कारवाईवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

राहुल गांधींचा मोठा दावा म्हणाले, “श्रीलंकेसारखं भारतातील सत्य देखील…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More