तेजप्रतापच्या कानाखाली वाजवणाऱ्यास 1 कोटी, भाजप नेत्याची घोषणा

Tej Pratap Yadav Facebook

पाटणा | लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादवच्या कानाखाली वाजवणाऱ्यास 1 कोटी रुपयांच्या इनामाची घोषणा करण्यात आलीय. भाजप नेते अनिल सहानी यांनी ही घोषणा केलीय. 

तेजप्रताप यादव यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना त्यांच्या मुलाच्या लग्नात घुसून मारण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सहानी यांनी ही घोषणा केलीय. 

दरम्यान, आपला मुलगा असं कोणतंही कृत्य करणार नाही, मोदींच्या त्यांच्या मुलाचं लग्न आरामात करावं, असं म्हणून लालूप्रसाद यांनी या प्रकरणावर पडदा टाकला होता. आता सहानी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं कळतंय.