खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेत्याला अटक!

ठाणे | खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेत्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. सुधीर बर्गे असं या भाजप नेत्याचं नाव आहे.

प्रसिध्द हिरानंदानी बिल्डर यांच्याकडे खंडणीसाठी बर्गे यांनी तगादा लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे  ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान 2007 साली ठाण्याच्या लोकमान्य नगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बर्गे निवडून आले होते. तर गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेनेच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्त्युत्तर, म्हणाले…

-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे!

-“अजित पवार जेवढ्या मतांनी निवडून येतात तेवढा ‘सामना’चा खप तरी आहे का?”

-माझ्यामुळेच सुप्रिया सुळे खासदार झाल्या आहेत, हे त्यांनी विसरू नये!

-उद्धव ठाकरेंवर पुन्हा बोललात तर दिल्लीऐवजी बारामतीत घरी बसवू!