मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल दसरा मेळाव्यातील भाषणात भाजप, कंगणा राणावत, मोदी सरकार, राणे पिता-पुत्र आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकाचे बाण सोडले. यामध्ये उद्धव ठाकरेंनी काहींवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
उद्धव ठाकरेंनी मेळाव्याच्या भाषणात ज्यांच्यावर टीका केली त्यांनी प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्या निमित्त केलेल्या भाषणात भाजपची दहशत होती याचाच आनंद झाला, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या भाषणातून केवळ जळफळाट दिसून आला. त्यात काही नवीन नसल्याचंही शेलारांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी टीका केल्यावर त्यांच्यावर भाजप नेते निलेश राणे, राम कदम आणि अभिनेत्री कंगणा राणावतने टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणेंनीही गंभीर टीका केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं हिंदुत्व आहे?, असा सवाल करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
रामदास आठवलेंच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोषचा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश!
“मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत? त्यांना नव्या मित्रांची भीती वाटत असावी”
मी तुमचं काय अभिनंदन करू मला अभिनंदन करायचीही लाज वाटत आहे- नितीन गडकरी
देवेंद्र फडणवीसांबाबत असं वक्तव्य करणं योग्य नाही- रोहित पवार
Comments are closed.