महाराष्ट्र मुंबई

“चमत्काराची वाट पाहणाऱ्यांचा हा चमत्कारिक कारभार…वाचव रे विठ्ठला”

मुंबई | कोरोनाच्या परिस्थितीमुळे परीक्षा न घेण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो निर्णय जाहीर केला. पण एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.

चमत्काराची वाट पाहणाऱ्यांचा सगळा हा चमत्कारिक कारभार! वाचव रे बा, विठ्ठला!!, असं म्हणत शेलार यांनी राज्य सरकारवर टीकेचा बाण सोडला. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय काढून आज 15 दिवस झाले. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. उच्च शिक्षण मंत्र्यांनी त्यावर बैठकही घेतली नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, यापूर्वीही एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या निर्णयावरून आशिष शेलार यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज 6364 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

कमलनाथ हे कोरोनापेक्षाही मोठी समस्या- शिवराज सिंह चौहान

महत्वाच्या बातम्या-

2011 वर्ल्ड कप फायनल फिक्सिंग प्रकरणी संगकाराची तब्बल 8 तास चौकशी, पाहा काय आहे प्रकरण…

NEET आणि JEE च्या परीक्षा पुढे ढकलल्या; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

कोरोना रूग्णाला आता नातेवाईक भेटू शकणार, तशी सोय करण्याची आरोग्यमंत्र्यांचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या