बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसला ना इज्जत ना किंमत, झुकायचं की नाक घासायचंय हा…”

मुंबई | तृणमुल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांची तसेच राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. ममता बँनर्जी विरोधी पक्षातील आघाडी करण्यासाठी विविध पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. (Ashish Shelar has criticized the Congress)

काँग्रेसवर टीका करताना ‘दुर्देवाने काँग्रेसला ना स्थान, ना स्थिती, ना वेळ, ना काळ, ना इज्जत, ना किंमत आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला काहीही ते द्यायला तयार नाहीत. पण आम्हाला काय पडलयं, काँग्रसने फरफटायचयंं, झुकायचंय, नाक घासायचंय हा त्यांचा प्रश्न आहे, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या गुप्त भेटी घेत असल्याने त्यावरून आशिष शेलार यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी गळे चिरणे याचे धडे गिरवले आहेत का? याची माहिती महाराष्ट्राला दिली पाहिजे. नात हे वरकरणी दाखवण्यासाठी आहे. बांगलादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय ?,असा प्रश्न त्यांनी केला आहे.

दरम्यान, कालपर्यंत भिवंडीमध्ये बांग्लादेशी लोक पकडले जात होते. मग अशा पद्धतीने बांग्लादेशींवरच्या कारवाया कुठेतरी थांबल्या पाहिजे अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी युवा मंत्र्यांना केली नाही का? आम्हाला जय हिंदू राष्ट्र मान्य आहे. हे शिवसेनेला मान्य आहे का? हे ममताला मान्य आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती आशिष शेलारांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“ठाकरे सरकार अपशकुनी, फडणवीस सरकारनं मिळवलेलं Maratha Reservation घालवलं”

IPL Retention: कहीं खुशी कहीं गम, वाचा रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी

“वीज फुकटात तयार होत नाही, शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल”

“Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रसुद्धा…”, ममता बॅनर्जींना खात्री

“अयोद्धा-काशी जारी है, मथुरा की अब तैयारी है”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More