बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

मुंबई | भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मी आज कोविड 19 ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आलीय. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे, असं शेलारांनी सांगितलं आहे.

जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्या सर्वांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचंही आशिष शेलारांनी सांगितलंय.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चाललाय. अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली होती. रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यानंतर त्यांनी चाचणी केली असता, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

थोडक्यात बातम्या- 

“शरद पवारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं”

कोहलीनं शाहबाज अहमदला चेंडू सोपवला अन् सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला

“आपण कुणाच्या भानगडीत पडत नसतो, आपला नाद करायचा नाय”

उस्मानाबादेत एकाशेजारी एक 19 चिता पेटल्या, जागा कमी पडल्यानं 8 अंत्यसंस्कार उद्या

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात गारपिटीमुळे गारांचा खच, विश्वास बसणार नाही असा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More