बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे पाकिस्तानी समर्थकांचे मंत्रिमंडळ, असे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीच झाले नाही”

नाशिक | राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात गरमा गरमी पाहायला मिळत आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत नवाब मलिकांना ताब्यात घेतलं.

नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाविकास आघाडीकडून ईडी व भाजपवर टीका होत असताना भाजपकडून ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं जात आहे. त्यात भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

पाकिस्तानमधून रसद घेऊन भारतावर हल्ला करणाऱ्या लोकांच्या समर्थकांचे हे मंत्रिमंडळ आहे. असे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीच झाले नाही. नाकर्ते आणि निष्ठूर लोकांचे हे मंत्रिमंडळ आहे, असा घणाघात आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

दरम्यान, मंत्री नवाब मलिक दाऊदच्या बहिणीशी सलगी करतात. स्वत:चा पैसा बॉम्बस्फोटासाठी वापरतात, असा आरोप देखील शेलारांनी केला आहे. तर बॉम्बे एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेची रेकी करून बॉम्बस्फोटाने उडवून द्यायची होती, असा हल्लाबोल देखील आशिष शेलारांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संभाजीराजे यांचं उपोषण सोडवावं”

फोन टॅपिंग प्रकरणात गृहमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले…

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, राज्यपाल कोश्यारींनी दिले ‘हे’ आदेश

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

“शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, मग राष्ट्रवादीच्या का नाही?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More