महाराष्ट्र मुंबई

…म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामाची आणि आरोग्यविषयक उपाययोजनांची माहिती दिली. त्याचबरोबर राज्यातील राजकारणावरूनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चिमटे काढले आहेत.

राजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय? खासदार संजय राऊत आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना?, असा सवाल भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.

मुख्यमंत्री म्हणतात आधी करोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार. आमच्या कोकणी भाषेत म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?. मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करत होतात ते काय होते? फसवणूक? आता बोलून नाही, करुन दाखवा, असं आशिष शेलारांनी म्हटलंय.

दरम्यान, अडचणीत आलेला शेतकरी, बलुतेदार, महिला बचत गट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार आणि मुंबईकर, करदाते यांना काही तरी मदत करावी असं वाटत नाही का?, असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केलाय.

ट्रेंडिंग बातम्या-

‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं

31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे जग बुडालं पण ‘हा’ व्यक्ती झाला मालामाल

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ‘एसएलबीसी’ची बैठक तातडीने बोलवा-फडणवीस

मंंत्री नवाब मलिकांकडून रमजान ईदच्या शुभेच्छा तर मुस्लिम बांधवांना कळकळीचं आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या