बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, त्यांची छटाकभर लायकी मात्र…”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांचा 81 वा वाढदिवस काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादीतर्फे (NCP) मोठ्या गाजावाजात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षाच्या नेत्यानी पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. पवार यांची स्तुती करताना राष्ट्रावादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLC Amol Mitkari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी अमोल मिटकरी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

शरद पवार साहेबांच्या तब्येतीची विविध पक्षातील नेत्यांना काळजी असते. पण त्यांनी काळजी करू नये साहेब खूप जणांच्या अंत्ययात्रेस जाऊन आले आहेत. आता काही दिवसांमध्ये ते गुजरातला जाणार आहेत, अशी वादग्रस्त टीका केली होती. यावरून अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार टीका होण्यास सुरूवात झाली आहे. अमोल मिटकरी यांच्यावर भाजपकडून शेलक्या शब्दात टीका करण्यात येत आहे.

कोण किती जगतो हे केवळ त्या परमेश्वराच्या हाती. माणूस कसा जगला त्यापेक्षा त्याने जन्माला येऊन काय केले याची दखल जग घेतं. मिटकरींसारख्या कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात, पण त्यांची छटाकभर लायकी मात्र जगाला दिसते, अशी लायकी काढणारी टीका भातखळकर यांनी मिटकरी यांच्यावर केली आहे. परिणामी आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू झालेला हा गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. मिटकरी हे आपल्या आक्रमक भाषणांसाठी राज्यभर ओळखले जातात. आपली आक्रमक शैली त्यांना आता वादात अडकवण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

“निवडणुका होणारच, ते ही ओबीसी आरक्षणाशिवाय”, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी”

“हा सगळा प्री प्लॅन होता, त्यांच्या जाण्यानं मनसेला…”

“…म्हणून माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली”; रूपाली ठोंबरेंनी सांगितलं कारण

Bank worker Strike: …म्हणून उद्यापासून दोन दिवस बँका बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More