प्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली!

भोपाळ | निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. तसंच यावेळी एका तरूणाने भाजप आमदार यशपाल सिंह यांच्या कानफडात लगावली.

मंदसौर मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या यशपाल सिंह यांना यावेळेस तिसऱ्यांदा भाजपने तिकीट दिले आहे.

यशपाल सिंह मंगळवारी त्यांच्या मतदारसंघातील अलावदाखेडी गावात प्रचार करत असताना अचानक एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या कानशिलात लगावली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मारहाण केलेल्या तरूणाला ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांची मानसिक स्थिती योग्य नसल्या कारणाने त्यांने आमदारांच्या कानफडात लगावली, असल्याचं बोललं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

-वेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी

-‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक!

-अनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त

-ऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार?