बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेत्याकडून भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | होळी समारंभातील भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रियो यांनी भाजपच्याच एका कार्यकर्त्याच्या कानाखाली लगावल्याचं दिसत आहे.

रविवारी 28 मार्च दिवशी टाॅलीगंज येथे एक होळी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बाबुल सुप्रियो यांनी उपस्थिती लावली होती. सुप्रियो या समारंभात 12 वाजता हजर होणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांना उशिर झाला आणि ते दुपारी अडीच वाजता आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत देखील केलं.

आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळेस स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होत. यादरम्यान सुप्रियो प्रसारमाध्यमांशी बोलताना एका कार्यकर्त्याने त्यांना तुम्ही आधीच उशिरा आले असून सगळे तुमची वाट पाहत असल्याचं सांगितलं. मात्र त्यावेळेस सुप्रियो यांनी त्याला थांबण्यास सांगितलं. काही वेळानंतर सुप्रियो यांनी त्या कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यलयात नेऊन कानाखाली लगावली.

दरम्यान, हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांनी कॅमेरामध्ये रेकाॅर्ड केला. आपला व्हिडीओ रेकाॅर्ड झालं असल्याचं समजताच सुप्रियो यांनी त्यांचा कॅमेरा काढून घेतला आणि काही वेळ त्यांच्या कडेच ठेवला. मात्र आता हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत का?’; षटकार मारल्यावर स्टोक्सनं शार्दुलची बॅट तपासली

‘ही’ प्रसिद्ध गायिका लवकरच करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

“रिषभ पंत असाच खेळत राहिला तर एक दिवस धोनीलाही मागे टाकेल”

महाराष्ट्रात कोणासोबत सरकार बनवणार… अमित शहांच्या नव्या वक्तव्याने मोठी खळबळ

अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यात यश ; मंत्री यशोमती ठाकूर यांची धडक कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More