“आम्हाला मुस्लिमांच्या एका मताचीही गरज नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बंगळुरू | कर्नाटक भाजपचे (Bjp) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री केएस ईश्वरप्पा (KES Ishwarappa) यांनी एक वक्तव्य केलं आहे. आम्हाला मुस्लिमांच्या एका मताचीही गरज नाही. वीरशैव-लिंगायत धार्मिक विभाजनाच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत ईश्वरप्पा यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पाही उपस्थित होते.

कर्नाटकात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज हुबळी आणि पश्चिम धारवाड मतदारसंघात प्रचार करत आहेत.

कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 517 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने एकूण 2,613 उमेदवार शर्यतीत आहेत.

यासोबतच राज्यात निवडणुकीचा प्रचारही तीव्र झाला असून काँग्रेस आणि भाजपने आपल्या ज्येष्ठ नेत्यांना प्रचारासाठी उतरवलं आहे.

महत्वाच्या बातम्या-