भाजपनं राष्ट्रवादीला शिवसेनेसह सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं?

मुंबई | भाजपनं राष्ट्रवादीला शिवसेनेसह सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितल्याचं वृत्त ‘लोकमत’नं दिलं आहे. शरद पवारांनी मात्र या प्रस्तावाला होकार दिला नाही. 

शिवसेना सत्तेत नको होती, आम्हालाही स्वतःहून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढायचं नव्हतं. मात्र शिवसेना सत्ता सोडण्याची धमकी देत असताना राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी व्हावे, असा प्रस्ताव दिल्लीहून आला होता, असं या बातमीत म्हटलंय. 

दरम्यान, अनेक गोष्टी अंतिम टप्प्यातही आल्या होत्या. राष्ट्रवादीला शिवसेनेप्रमाणे 5 ते 6 मंत्रिपदं देऊन सत्तेत घ्याचं होतं, मात्र शिवसेना सत्ता सोडत नव्हती, असंही या नेत्यानं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांचा तो निर्णय देखील चुकीचा होता; तारिक अन्वर यांचं टीकास्त्र

-छगन भुजबळांचा आज बीडमध्ये एल्गार; करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

-शरद पवारांच्या वक्तव्यामुळे भाजपसाठी बुडत्याला काडीचा आधार!

-भाजपचे मंत्री 15 दिवसात दोनदा भेटीला, मात्र अण्णा हजारे उपोषणावर ठाम

-अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांनंतर नाना पाटेकर अज्ञातवासात?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा