Top News राजकारण

सरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करतायत- चंद्रकांत पाटील

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी धारेवर धरलंय. सरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करत असल्याचा आरोप राऊत यांच्यावर केला आहे. सामनाच्या माध्यमातून सदरातून संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकार ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप केला होता. त्यावर भाजपने आता सडेतोड उत्तर दिलंय.

ट्विटरवर चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र पोस्ट केलंय. यामध्ये ते म्हणतात, ‘खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सामनामधून भाजपा ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल असा आरोप केला आहे. मुळात राऊतांना तिन्ही पक्षामधील अतंर्गत भांडणावरुन सरकार पडेल अशी भीती आहे. जी ते भाजपच्या नावाने बोलवून दाखवत आहेत.’

‘कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत आज महाराष्ट्र अडकला आहे. त्यापेक्षा तुम्हाला भाजपवर आरोप करणं महत्त्वाचं वाटते का? सरकार पडण्याचा मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो का? राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहिन असल्याचे संपूर्ण देशाला माहित आहे.’ अशा कडक शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे.

‘कित्येक वर्षापासून मुंबई महापालिका तुमच्या हातात आहे. परंतु दरवर्षी प्रमाणे यंदाही पहिल्या पावसात तुंबली आहे. पूर्ण शहर 3 महिने रिकामं होतं त्यावेळी योग्य नियोजन करुन पावसाळ्याआधी सर्व कामं तुम्ही करु शकला असता. पण तुम्ही केलं नाही. परिणामी मुंबई पुन्हा तुंबली आणि कोरोनाच्या संकटात आता आणखी वाढ झाल्याची टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘; देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित

आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला 10,000 लोक; तीन गावं करावी लागली सील

महत्वाच्या बातम्या-

शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, बाळासाहेब थोरात म्हणाले…

मुख्यमंत्री इन अ‌ॅक्शन मोड; गृहमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय उद्धव ठाकरेंनी फिरवला!

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील ‘या’ तीन औषधांवर आणली बंदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या