बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊत बावचळले आहेत, म्हणून ते…”; भाजप नेत्याची राऊतांवर बोचरी टीका

 मुबंई | शिंदेगट स्थापन झाल्यापासून आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. कधी पत्रकार परिषदेतून तर कधी ट्विट करून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. यातच आता भाजप नेत चंद्रकात बावनकुळे (Chandrakat Bawankule) यांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

राजकारणात एक दुजे के लिए हा नवा सिनेमा सुरु आहे, असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. याबद्दल विचारलं असता सत्ता सत्तांतरामुळे संजय राऊत बावचळले आहेत. त्यामुळे त्यांना आता नागपूरला (Nagpur) जायची वेळ आली आहे. सकाळ दुपार संध्याकाळ नुसता माध्यमांशी संवाद साधून अशी टीका करत आहेत, असा टोला बावनकुळेंनी राऊतांना लगावला आहे.

आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारला मार्गी लावता आलेला नाही. काही नेत्यांना हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा करायचा होता. त्यामुळे समाजावर अन्याय होत होता. पण आता नैसर्गिक युती असलेले सरकार राज्यात (State) आहे. हे सरकार राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील. विरोधकांनी काही नाही झाले तरी सध्या सुरु असलेली विकासकामे ही शांत बसून पहावीत, असं त्यांनी माध्यामांशी बोलताना म्हणाले.

गडचिरोलीत पूर परिस्थीती पाहण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याठिकाणी गेले. महाविकीस आघाडी सरकार असत तर ऑनलाईन (Online) सभा घेत काळजी घेण्याचं आवाहन केलं असतं. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामुळे आता विकास कांमाचा सपाटा लावला आहे. सध्या विरोधकांकडून टीका होत असली तरी काही काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे होतील की त्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नसल्याचा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे

थोडक्यात बातम्या

“केंद्राकडून लोकशाहीचे पंखच नाही तर पायही छाटण्याचा प्रयत्न”

सुष्मिता सेन-ललीत मोदींच्या अफेरवर राखीची प्रतिक्रिया; नरेंद्र मोदींना केला हा सवाल

“राज्याच्या राजकारणात एक दुजे के लिए सिनेमा सुरु”

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

“दोन वाडपे व्यवस्थित वाढत असतील तर 40 जणांची काय गरज”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More