बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी ट्रॅफिक पोलिसांच्या बाईकवरुन केला प्रवास

पुणे। अखेर दोन वर्षेनंतर सर्वतंत्र गणेशउत्सव मोठ्या थाटामाठात साजरा होत असताना दिसत आहे. ढोल पथकांच्या जलोषाने लाडक्या बाप्पाचं सर्वत्र जोरदार स्वागत झालं आहे.

या सोबतच पुण्यातील रस्त्यावरील गर्दीमधून काढत आज गणेश भक्त बाप्पाचं दर्शन घेत आहेत.मात्र ही, गर्दी लक्षात घेता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका ट्रॅफिक पोलिसांच्या गाडीवर बसून इथल्या गर्दीचा आढावा घेतला.

पुण्यामधील ग्रामदैवत असलेल्या कसबा पेठेत जाऊन चंद्रकांत पाटील यांनी दर्शन घेतलं. इतकंच नव्हे तर त्यांनी पुण्यातील सर्व गणपतीचे दर्शन तर घेतलेच पण चंद्रकांत पाटील हे भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या रथामध्ये देखील बसले होते.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More