बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दिशा कायदा ही केवळ घोषणाच होती का?’; चित्रा वाघ यांचा अनिल देशमुखांना सवाल

मुंबई | पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

महिलांसाठी असलेला दिशा कायदा ही केवळ घोषणाचं होती का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

पनवेल क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार हा कोरोनापेक्षाही भयानक आहे. यापूर्वीही अशा सेंटरमध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या क्वारंटाइन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातचं कसे? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन काय करत असते?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केलं आहेत.

या घटनेतील आरोपीला अटक झाली आहे. पण त्यासोबत क्वांरटाइनसेंटरच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक, तिथले प्रशासनही तेव्हढेचं जबाबदार आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या भगिनीही सुरक्षित नाहीत, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“फडणवीसांना कोरोना वगैरे होऊ नये, त्यांचे बाल-बच्चे आणि राजकीय बगलबच्चेही सुखात राहोत”

नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कुख्यात डॉन संतोष आंबेकरलाही कोरोनाची लागण

अधुरी प्रेम कहाणी!; प्रियकराच्या आत्महत्येनंतर प्रेयसीनंही उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

पोलिसांना शिवीगाळ करणारा खा. विनायक राऊतांचा मुलगा; निलेश राणेंचा दावा

आईला मारहाण करायचे वडील, मुलांनी उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More