Chitra Wagh l विधानसभा निवडणुकीनंतर काल राज्य सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली आहे. अशातच आता भाजप नेत्या चित्र वाघ यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
चित्रा वाघ काय म्हणाल्या? :
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ एकनाथ शिंदे यांना घ्यावीच लागणार होती. कारण त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी देखील भाजपने केली होती. तसेच याबद्दलची माहिती माझ्याकडे पक्की आहे, त्याशिवाय मी बोलत नाही. तसेच सरकारमध्ये आमची माणसं आहेत असा गौप्य्स्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.
मात्र यांदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांना सवाल केला असताना त्यांनी अवघ्या एकाच वाक्यात संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप पक्षाने एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधीची तयारी केली होती असा दावा कऱणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाष्य करताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, “कुणाचं नाव, कुठे घेता. चांगल्या पवित्र ठिकाणी मी आलेय, कुठे गटाराचं नाव घेता” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.
Chitra Wagh l मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार का? :
दादर येथील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ दाखल होत्या. यावेळी अभिवादन केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता आहे की नाही? असा प्रश्न केला असता त्या म्हणाल्या, “आमचा सगळया लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री पदी असावा असा अट्टहास, अशी इच्छा होती. मात्र ती पूर्ण झाली आहे. तसेच येणाऱ्या दिवसात त्यांच्या सेनापतीच मंडळ दिसेल. त्यामुळे मी असेन किंवा नसेन त्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींचा समावेश झाल्याशिवाय राहणार नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
News Title – Bjp leader Chitra Wagh slams sanjay raut
महत्त्वाच्या बातम्या :
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!
रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता आणि रिक्त पदे
शाकाहारी लोकांना Heart attack चा धोका सर्वात कमी?, नवीन संशोधन समोर
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात काय आहेत सोने-चांदीचे दर?, जाणून घ्या एका क्लिकवर