बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ भाजप नेत्याने नरेंद्र मोदींची तुलना केली छत्रपती शिवाजी महाराजांशी, म्हणतात…

नवी दिल्ली | बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा अवमान केल्याची घटना घडली होती. त्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं. विशेष म्हणजे या प्रकरणात भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (Bjp leader sambit patra) यांच्या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

संबित पात्रा यांनी मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली आहे. तर गुजरातचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महाराणा प्रताप यांच्याशी तुलना केली आहे. खासदार असुद्दीन औवेसी यांना प्रत्युत्तर देताना पात्रा यांनी ही तुलना केली आहे. “कोणाला धमकवत आहात? लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा या भूमिवर औरंगजेब आणि बाबर येतील, तेव्हा या भूमीत वीर शिवाजी, महाराणा प्रताप आणि योगी- मोदी जन्माला येतील,” असं ट्विट संबित पात्रा यांनी केलं आहे.

“आम्ही ना मुघलांना घाबरलो होतो. ना जिन्नावाद्यांना, त्यामुळे तुम्हाला खाक घाबरणार?”, असा इशाराही संबित पात्रा यांनी ट्विटमध्ये दिला आहे. या ट्विटसोबत पात्रा यांनी असुद्दीन औवेसी यांचा व्हिडीओही शेअर केला आहे. असुद्दीन औवेसी यांनी 12 डिसेंबर ला कानपूर येथे एक भाषण केलं होतं. याच व्हिडीओवरून पात्रांनी हे उत्तर दिलं आहे.

दरम्यान, असुद्दीन औवेसी यांनी भाषणावेळी पोलिसांना सुनावलं होतं. मी त्या पोलिसावाल्यांना सांगू इच्छितो की, कायम योगीच मुख्यमंत्री राहणार नाहीत. किवां नरेंद्र मोदीचं पतंप्रधान राहणार नाहीत. जेव्हा योगी मठात जातील. अन् मोदी डोंगरात निघून जातीस. तेव्हा कोण येईल?, असं औवेसींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, फोटो शेअर करत म्हणाले…

माया इथंच संपत नाही! सुपेंकडे पुन्हा सापडलं ‘इतक्या’ लाखांचं घबाड

पंजाब सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांचं ‘इतक्या’ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार

‘एवढा स्टाफ काय करतो, काय झोपा काढतो काय’; अजित पवार संतापले

धक्कादायक! विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More