“दोन-चार कपडे काढले असते तर..”; विनेश फोगाटबद्दल भाजप नेत्याची वादग्रस्त पोस्ट

vinesh phogat | भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून (Paris Olympics 2024) अपात्र ठरवल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. विनेशने महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला (Vinesh Phogat) स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं. यानंतर भारतीयांची मोठी निराशा झाली. बऱ्याच जणांनी विनेशला रौप्य पदक दिले जावे, अशी मागणी केली.

यानंतर विनेश फोगाटने (Vinesh Phogat) तिला रौप्य पदक देण्यासाठी सीएएसकडे आवाहन केले होते. विनेश फोगटच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी याबाबतचा खटला लढवला. या प्रकरणी आता 13 ऑगस्टरोजी म्हणजेच उद्या मंगळवारी निकाल समोर येईल. अशात विनेशबद्दल भाजप नेत्याने एक वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

विशाल वार्षणेय नामक व्यक्तीची आक्षेपार्ह पोस्ट

भाजप नेत्याच्या या विधानावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर, त्याविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केली आहे. प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही संबंधित भाजप नेत्याला सुनावलं आहे. भाजप नेते विशाल वार्षणेय यांनी विनेशबद्दल हे धक्कादायक विधान केलं आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर या व्यक्तीने त्याच्या नावापुढे भाजप असं लिहिलं आहे. त्यामुळे ही व्यक्ती भाजपचा नेता किंवा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जातंय. (Vinesh Phogat)

“लैंगिक शोषणाचा आरोप तर केलाच होता. दोन-चार कपडे काढून टाकले असते तर 200 ग्रॅम वजन कमी भरलं असतं.”, अशी वादग्रस्त पोस्ट विशाल वार्षणेय नामक व्यक्तीने लिहिली आहे. जाट समाजाने या पोस्टचा विरोध केला असून त्यांनी एफआयआरसुद्धा दाखल केली.

प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंह राठोडचा संताप

या प्रकरणावर प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही संताप व्यक्त केला आहे. भाजप नेत्याच्या पोस्टवर तिने लिहिलं, ‘आक थू!’ विनेशबद्दल अशी पोस्ट लिहून केवळ तिचाच नाही तर देशाचाही अपमान केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. तर, ही संतापजनक पोस्ट करणारा व्यक्ती भाजपचा आहे की, नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये. मात्र, त्याने आपल्या सोशल मीडियावर भाजप असं लिहिलं आहे. (Vinesh Phogat)

दरम्यान, विनेशने उपांत्य फेरीत क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा 5-0 गुणांनी पराभव केला होता. विनेशच्या या कामगिरीने भारताचं स्पर्धेतील चौथं पदक पक्क समजलं जात होतं. मात्र, तिला फायनल पूर्वीच अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.

News Title :  BJP leader controversial post on Vinesh Phogat

महत्त्वाच्या बातम्या-

या राशीवर महादेवाची कृपा राहणार!

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर!

मोठी बातमी! मराठा आंदोलकांनी शरद पवारांना घेरलं

सिद्धार्थ मल्होत्राचा नको तसला व्हिडीओ व्हायरल, सर्वांसमोर केलं असं काही की…

“आम्ही घटस्फोट घेत आहोत…”, अभिषेक बच्चनच्या खुलाशाने खळबळ