Top News अहमदनगर महाराष्ट्र

“महविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का?”

अहमदनगर | केंद्रावर टीका करणं म्हणजे आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जर तुमच्यात राज्य चालवण्याची धमक असेल ना तर मग केंद्राकडे बोट का दाखवता, असा सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्य सरकारला केला आहे.

तुम्ही राज्यातील जनतेसाठी काय करणार हे जनतेला सांगा. महविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का?, तुम्ही सर्व तत्व पायदळी तुडवत सत्ता स्थापन केली असल्याचं विखे पाटील म्हणाले.

सरकारच्या अजेंड्यावर सामान्य माणूस आहे ना शेतकरी… फक्त मुठभर लोकांसाठी सत्ता टिकवण्याची धडपड महाराष्ट्रात सुरु आहेत. बहुतेक मंत्र्यांचे लक्ष आपल्या विभागातील बदल्यांकडे असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, अतिवृष्टीनंतर सरकारला उशिरा जाग आली आहे. शेतकरी सर्व उद्धवस्त झाला आहे आणि आता सरकार त्यांना मदत करायला निघाला आहे. मात्र शेतकऱ्यांपर्यंत तुमची मदत पोहोचत आहे का?, असा सवालही पाटलांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…तरी देखील मी माझ्या मुलाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागते”

“अतिवृष्टीच्या मदतीमध्ये वाढ करावी, अन्यथा सरकारला हादरवणारे आंदोलन करु”

“सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल”

“त्यांना वाटलं की संधी आली अशोक चव्हाणला ठोका, पण…”

एक बाप म्हणून मी माफी मागतो, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही- कुमार सानू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या