Top News देश

‘हाथरस प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष, त्यांची तात्काळ मुक्तता करा’; ‘या’ भाजप नेत्याची मागणी

लखनऊ | हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची काहीही चूक नसून त्यांची त्वरित सुटका करण्यात आली पाहिजे, असं बाराबंकी येथील भाजपचे नेते रणजित श्रीवास्तव यांनी म्हटलंय.

मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलाविले होते, कारण प्रेमाचा मामला होता. या सर्व गोष्टींचा तपशील समाजमाध्यमांवर व वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमध्येही उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या मुली काही विशिष्ट जागीच मेलेल्या आढळून आल्या आहेत. या मुलींचे मृतदेह उसाच्या, मका, बाजरीच्या शेतात, नाल्यामध्ये, झाडाझुडपांत, जंगलामध्येच आढळून येतात, असं श्रीवास्तव म्हणालेत.

दरम्यान, या सगळ्या गोष्टींचा नीट विचार झाला पाहिजे. श्रीवास्तव यांचे विचार पुराणकालीन, तसेच अत्यंत बुरसटलेले असल्याची टीका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

‘एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा…’; खासदार संभाजीराजेंचा इशारा

“सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध”

‘पोलीस दलात 33 टक्के महिलांची भरती करा’; या महिला शिवसेना आमदाराची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या