बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा”; भर बैठकीत देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीचं ऑनलाईन आयोजन केलं होतं. या बैठकीला भाजप नेते उपस्थित होते, यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश होता. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक इशारा दिला.

मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा असं, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं आहे. हा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी का दिला? याची चर्चा आता सुरु झाली आहे. पूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं, सतत केंद्राकडे बोट दाखवाल, तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका, असं ते म्हणाले.

सध्या कोरोना लसीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. कोरोना लसीच्या वाटपात केंद्रातील भाजप सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून सातत्याने केला जात आहे, यामुळे भाजपची प्रतिमा खराब होत असल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे आज देवेंद्र फडणवीसांनी भर बैठकीत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचं जाहीर करुन अजित पवार यांनी देखील त्यांच्या निर्णायाला पाठिंबा दिला आहे, मात्र दुसरीकडे लॉकडाऊनला थेट पाठिंबा देणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याचं दिसत आहे. लॉकडाऊन केल्यास लोकांचा उद्रेक होईल, असं त्यांचं मत आहे.

थोडक्यात बातम्या-

नागरिकांनो तयारी ठेवा!; मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात मांडली ‘ही’ महत्त्वाची भूमिका

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे गैरहजर; अनुपस्थितीचे खरे कारण आले समोर

महाराष्ट्रात संपूर्ण लॅाकडाऊन होणार?, आत्ताच बाहेर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

अमृता फडणवीसांनी का टाकला हा फोटो?, जाणून घ्या गुपित

पुण्याला अजून थेट केंद्राची मदत नाहीच, महापौरांचा ‘तो’ दावा ठरला फोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More