पुणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीला पाठींबा!

पंढरपूर | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला माळशिरसमध्ये मोठा धक्का बसला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा दिला आहे. यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून केवळ स्वार्थासाठी बाहेरचा उमेदवार लादला गेल्याने आपण राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली असल्याचं धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितलं आहे.

भाजप नेत्याने राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याने माळशिरसमध्ये आता भाजप विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याएवजी मोहिते पाटील विरूद्ध मोहिते पाटील, असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 21  ऑक्टोबरला मतदान होत असून 24 ऑक्टोबरला मतमोजनी होईल. त्यामुळे आता महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या