सत्तेसाठी भुकेलेले भाजप नेते पर्रिकरांना आरामही करू देत नाहीत!

पणजी | सत्तेसाठी भुकेलेले भाजप नेते पर्रिकरांना आरामही करू देत नाहीत, असं वक्तव्य आरएसएसचे गोव्यातील नेते सुभाष वेलिंगकर यांनी केलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

मनोहर पर्रिकरांना पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. पण अशा परिस्थितीत भाजपा हायकमांडकडून त्यांच्यावर अनावश्यक दबाव आणला जात आहे. हे दुर्देव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपा आता विचारधारेवर चालणारा पक्ष राहिलेला नाही. निवडून आलेल्या प्रतिनिधींना पक्षाच्या विचारधारेशी काहीही देणेघेणे असंही ते म्हणाले.

दरम्यान, काहीही करुन भाजपाला गोवा आपल्या ताब्यात ठेवायचे आहे. त्यांना गोव्याची सत्ता सोडायची नाहीय. त्यासाठी पर्रिकरांवर दबाव आणला जातोय. त्यामुळे त्यांची तब्येत आणखी बिघडत चाललीय, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवार आणि राज ठाकरेंचा एकाच विमानातून प्रवास; आघाडीसाठी खलबतं?

-राहुल गांधी म्हणाले, चौकीदार… लोक म्हणाले, चोर है… पाहा व्हिडिओ

-उत्तर भारतीयाला मारहाण करणाऱ्या तीन शिवसैनिकांना अटक!

-अयोध्येत राम मंदिराएेवजी मशिद बांधा; भाजप नेत्याची मागणी!

-स्मृती इराणींनी टाकलेल्या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा!