भाजप शहराध्यक्षाची गुंडागर्दी, पोलीस अधिकाऱ्यालाच केली मारहाण

जळगाव | चोपडा येथील पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी त्यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम होता. वाहतूक नियमन सदराखाली पोलिसांनी नरेंद्र पाटील यांच्या गाडीला थांबवण्यास सांगितलं. मात्र, यावर त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

यावेळी पोलीस निरीक्षक किसन पाटील तेथे आले, तेव्हा त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चोपडा पोलीस ठाण्यात नरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर खरंच पाडणार का?, वाचा काय आहे सत्य…

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ

-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???