मुंबई | भारतीय कायदा म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जहागीर नाही, अशी घणाघाती टीका भाजपचे नेत गिरीश व्यास यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना तुरूंगात टाकण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावरून व्यास चांगलेच भडकले आहेत.
माझ्या हातात सत्ता द्या. 2 दिवसांसाठी का होईना…. मी मोहन भागवत यांना तुरूंगात टाकतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. याच प्रकरणी भाजपने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
ज्यांचा वारसा मिळाला आहे आणि ज्यांच्यामुळं त्यांना थोडाफार सन्मान मिळतो आहे, अशा नेत्यांनी असं थिल्लर वक्तव्य करू नये. लोकप्रियता मिळविण्यासाठी कामं करावीत, असं व्यास म्हणाले.
दरम्यान, सरसंघचालकांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर आणि भाजपमधील वाद चांगलाच पेटला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसचा ‘हात’ झिडकारून या आमदार शिवसेनेत प्रवेश करणार!
-बाहेरच्या नेतृत्वाला नगरमध्ये ‘नो एन्ट्री’; विखे-पाटलांचा रोहित पवारांना इशारा
-स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कुणाची भीक नको; संभाजीराजेंनी तावडेंना सुनावलं
-“भारताच्या संविधानाला मी खेकड्याची उपमा देतो”
-आमच्या हातात सत्ता द्या… स्थानिकांना 75 टक्के रोजगार देतो- अजित पवार
Comments are closed.