बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अभिनंदन! पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत”

सांगली | काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशातील 12 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाकडे या नेत्यांनी लक्ष वेधलं असून, यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधनानांना पाठवलेल्या पत्रानंतर भाजपचे आमदर गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी काही प्रश्न विचारले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहून पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय. मात्र राजकीय तडजोडीमुळे भविष्यात त्यांचा ‘पाकधर्जिणा’ अशी ओळख असलेल्या नेत्यांमध्ये समावेश होण्याचा धोका आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणाची नांदी दिली. याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. खासदार संजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केव्हाच लागले आहेत आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकलं असल्याचंं गोपीचंद पडळकर म्हणाले.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी काही प्रश्न विचारले आहेत. याचंपण उत्तर देणार का?, किंबहूना देणार का?, असा टोलाही पडळकरांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. या प्रश्नांची उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली नाही तर जनता काय ते समजून जाईल, असंही पडळकर यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“कोरोना काळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल”

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली

कोरोनाला हरवणारी देशातील सर्वात लहान कोरोना वॉरियर बनली ही चिमुकली, पाहा व्हिडीओ

‘गंगा नदीत तरंगणारे मृतदेह हे….’; कंगणा राणावतचा जावईशोध

‘आम्ही दोघं बाजारात गेलो, तेव्हा…’; आई-वडिल घरात नसताना अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More