अजित पवारांना मोठा झटका, बारामती शेजारचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

Sharad Pawar Group | माजी मंत्री आणि भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र येथे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. अजित पवार आता महायुतीमध्ये असल्याने ही जागा राष्ट्रवादीलाच मिळण्याची शक्यता आहे.  या जागेबाबत अजूनतरी संभ्रमच आहे. अशात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काल (27 ऑगस्ट) भेट घेतली आहे.(Sharad Pawar Group)

गेल्या अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच त्यांनी काल शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतल्याने या चर्चेला अजूनच उधाण आले आहे.

हर्षवर्धन पाटील देणार भाजपला धक्का?

मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्या चर्चेला या भेटीमुळे आणखी हवा मिळाली आहे. ही भेट अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का देणारी ठरू शकते. (Sharad Pawar Group)

दत्तात्रय भरणे हे सध्या इंदापूरचे आमदार आहेत. त्यातच भाजपचे हर्षवर्धन पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. अशात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. आता जर, हर्षवर्धन पाटील यांनी हातात तुतारी घेतली आणि त्यांना पवारांनी उमेदवारी दिली तर अजित पवार यांचं टेंशन वाढू शकते.

हर्षवर्धन पाटील व शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “निवडणुकीच्या काळात काहीजण इकडचे तिकडे तर तिकडचे काही इकडे येतात. मात्र, हर्षवर्धन पाटील आमच्याबरोबरच राहतील असा आम्हाला विश्वास आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत. आता हर्षवर्धन पाटील पुढे काय भूमिका घेणार?, याकडे सर्वांचं लक्ष राहील.तसेच, महायुतीमध्ये ही जागा नेमकी कुणाला मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा असतील. (Sharad Pawar Group)

दरम्यान, अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील , पंढरपूरचे प्रशांत परिचारक , इंदापूरचे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) , पुण्यातील बापू पाठारे , भुईंजचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या देखील मविआ नेत्यांसोबत उमेदवारीसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात विधानसभा निवडणूक आणि उमेदवारीचं तिकीट याचीच चर्चा आहे.

News Title – BJP leader Harshvardhan Patil may join Sharad Pawar Group

महत्त्वाच्या बातम्या-

PPF आणि सुकन्या समृद्धी अकाउंट असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

महिलांना अशाप्रकारे घरबसल्या करता येणार पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार

नवीन कार विकत घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कुठे ओसरणार तर कुठे बरसणार?, पावसाबाबत IMD कडून महत्वाची अपडेट

फडणवीसांना मोठा झटका, ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या गळाला?