Top News

ट्विटरवरून भाजप शब्द हटवण्याच्या चर्चांवर ज्योतिरादित्य शिंदेंनी मौन सोडलं, म्हणतात…

भोपाळ | काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपतही नाराज आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. यावर एका वाक्यात बोलत ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखेर मौन सोडलं आहे.

चुकीच्या बातम्या सत्यापेक्षा अधिक वेगानं पसरतात, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटचा जो फोटो व्हायरल होत होता त्यामध्ये त्यांनी जनतेचा सेवक आणि क्रिकेट प्रेमी असं लिहिलं होतं. यातून त्यांनी भाजपा हा शब्द हटवल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत होता.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी यापूर्वी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल केला होता. त्यांनी काँग्रेस महासचिव, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री याऐवजी जनतेचा सेवक आणि क्रिकेट प्रेमी असं लिहिलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

महत्वाच्या बातम्या-

“पुढील दोन ते तीन महिन्यात कोरोनावर लस येण्याची शक्यता”

मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट

कोरोनाच्या गंभीर रुग्णांनाच बेड मिळावा- किशोरी पेडणेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या