Top News देश राजकारण

सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले….

राजस्थान | बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या  सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे. शिवाय त्यांच्या जवळ असणाऱ्या तीन आमदारांची मंत्रिपदंही काढून घेण्यात आल्याची माहिती आहे.

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षात क्षमतेला स्थान नाही. अशी परिस्थिती प्रत्येक राज्यात दिसून येत आहे, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलंय.

भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती यांची ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेसवर आरोप केलेत. मध्य प्रदेशात 15 महिने काँग्रेसने व्यापार आणि भ्रष्टाचाराचं सरकार चालवलं. त्यामुळे राज्यातील जनतेचा अपेक्षा भंग झाला, असा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे.

पूर्ण बहुमताने निवडून आलेलं सरकार पाडण्यामागे भाजपचं षडयंत्र आहे. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपनं सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, असा काँग्रेसने केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

‘राजस्थानमध्ये भाजप सरकार येईल अन् महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरेंचं सरकार जाईल’; केंद्रीय मंत्र्याचा खळबळजनक दावा

राज्यात आज 6741 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

‘हे’ कारण देत कोरोना टेस्ट करण्यास रेखाने दिला नकार!

‘नागपुरातील हनीट्रॅप प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करा’; देवेंद्र फडणवीसांचं अनिल देशमुखांना पत्र

आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरातही १६ जुलैपासून लॉकडाऊन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या