इंदोर| सध्या देशभरात कोरोना विषाणूने हैदोस माजवला आहे. जागतिक आरोग्य संस्थेनं कोरोनाला जागतिक महाबिमारी ठरवलेलं असतानाच भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
आपल्या देशात 33 कोटी देव वास्तव्यास आहेत आणि त्यामुळं या रोगाचा काहीही परिणाम देशवासींयांवर होणार नाही असं विधान भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजवर्गीय यानी केलं आहे, या विधानामुळं सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल होताना पहायला मिळत आहेत.
बजरबट्टू संमेलनात हनुमानाची वेशभूषा करणारे माजी आमदार जीतू जिराती यांच्याकडे पाहत ते म्हणाले, ‘बजरबट्टू संमेलनामध्ये जिराती यांना कोरोना हनुमान नाव देण्यात आले आहे, ज्यांच्या आशीर्वादाने कोणालाही संसर्ग होणार नाही’
सध्या देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 80 पेक्षा जास्त आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 19 वर पोहोचली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा 18 रोजी
कौतुकास्पद! वडिलांसोबत दुकानात काम करत शुभम गुप्ता झाला IAS
महत्वाच्या बातम्या-
‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’; स्पर्धकाला झापणारी नेहा धुपिया सोशल मीडियावर ट्रोल
विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्या; सक्षणा सलगर यांची मागणी
‘महापुरुषांचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता’; निलेश साबळेने मागितली माफी
Comments are closed.