Top News देश

भाजप नेत्याचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ

नवी दिल्ली | राजस्थानच्या प्रतापगडमधील भाजप नेते कैलास गुर्जर यांचा महिलेसोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे.

भाजपच्या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष असलेले कैलास गुर्जर यांचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये कैलास गुर्जर एका महिला डान्सरबरोबर अश्लील नृत्य करताना दिसत आहेत. यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.

मी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे हा प्रकार घडला. ते माझं वैयक्तिक आयुष्य आहे. त्या कार्यक्रमाचा भाजपशी काहीही संबंध नाही. काही लोक त्या व्हिडीओचा वापर करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं कैलास गुर्जर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रतापगडमध्ये काही दिवसांवर नगर परिषदेच्या निवडणुका आल्या आहेत. यादरम्यान भाजप नेत्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकारण तापलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत त्यांनी आता सुदर्शन काढावं”

“शरद पवारांनी दिलेली वाट तात्पुरती, कॉंग्रेसला कोणीही संपवू शकत नाही”

“अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा”

‘महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी’; शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर

“चहल मी लक्षात ठेवेल, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या